India Corona Update : सलग तिसऱ्या दिवशीही चार लाखांहून अधिक रुग्ण ; 4,187 मृत्यू 

एमपीसी न्यूज – देशातील कोरोना संसर्गाची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. देशात आज (शनिवारी, दि.08) सलग तिसऱ्या दिवशीही चार लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे मृतांची संख्या देखील चार हजारांहून अधिक झाली आहे. देशात तीन दिवसांत 12 लाख कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 4 लाख 01 हजार 078 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 18 लाख 92 हजार 676 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 79 लाख 30 हजार 960 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 3 लाख 18 हजार 609 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

देशात सध्या 37 लाख 23 हजार 446 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत 4 हजार 187 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 2 लाख 38 हजार 270 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.08 टक्के एवढा आहे‌. देशाचा रिकव्हरी रेट 81.90 टक्के एवढा झाला आहे.

देशात आजवर 30 कोटी 04 लाख 10 हजार 043 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 18 लाख 08 हजार 344 चाचण्या शुक्रवारी (दि.07) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 16 कोटी 73 लाख 46 हजार 544 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.