India Corona Update : देशात चोवीस तासांत 3,66,161 नवे रुग्ण, 3,53,818 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांत 3 लाख 66 हजार 161 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 3 लाख 53 हजार 818 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील चार दिवस चार लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आज समोर आलेली आकडेवारी किंचित दिलासा देणारी आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 26 लाख 62 हजार 575 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 86 लाख 71 हजार 222 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 3 लाख 53 हजार 818 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

देशात सध्या 37 लाख 45 हजार 237 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत 3 हजार 754 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 2 लाख 46 हजार 116 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.08 टक्के एवढा आहे‌. देशाचा रिकव्हरी रेट 82.38 टक्के एवढा झाला आहे.

 

देशात आजवर 30 कोटी 37 लाख 50 हजार 077 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 14 लाख 74 हजार 606 चाचण्या रविवारी (दि.09) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात 17 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 17 कोटी 01 लाख 76 हजार 603 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.