Moshi Crime News : अवैधरित्या दारूची वाहतूक केल्याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई; चार कार, दीड लाखाची दारू जप्त

एमपीसी न्यूज – अवैधरित्या दारूची वाहतूक केल्याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करत चार कार आणि एक लाख 59 हजार रुपयांची दारू जप्त केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 18) सकाळी संतनगर, मोशी येथे करण्यात आली.

सोमनाथ किसनराव रासकर (वय 38, भोसरी), दिगंबर मारुती गायकवाड (वय 39, रा. चिंबळी, ता. खेड), मंगेश बाळासाहेब शिवले (वय 31, रा. डुडुळगाव, ता. हवेली), सुनील बाळू देडे (वय 27, रा. भाटनगर, पिंपरी) यांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींसह रितिक वाईन्सचे मालक, तुळजाई हॉटेलचे मालक सचिन सस्ते यांच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळच्या वेळी दारू विक्री बंद असताना देखील स्पाईन सिटी चौक, मोशी येथील रितिका वाईन्स मधून अवैधरित्या दारू विक्री केली जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संत नगर मोशी येथे आरटीओ रोड चौकात सापळा लावून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी एक लाख 59 हजार रुपये किमतीची देशी, विदेशी दारू आणि बियरच्या बाटल्या जप्त केल्या. तसेच 10 लाख 30 हजार रुपये किमतीच्या चार कार जप्त केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.