Chinchwad Crime News : कोयते, काठ्या घेऊन दहशत माजवणा-या तिघांना अटक

एमपीसी न्यूज – कोयते, काठ्या घेऊन शिवीगाळ करत परिसरात दहशत माजवल्या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 17) रात्री साडेदहा वाजता गुरुद्वारा चौक ते आर के हॉटेल व त्यापुढील रस्त्यावर घडली.

अनिकेत सुरेश भोगे (वय 24, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), कुणाल शेखर दळवी (वय 21, रा. प्रेमलोकपार्क, चिंचवड), नितीन संजय सरोदे (वय 23, रा. प्राधिकरण, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी संकेत सुरेश गरुडे (वय 34, रा. गहुंजे) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गुरुद्वारा चौक परिसरात हातात कोयते आणि लाकडी दांडके घेऊन मोठमोठ्याने शिवीगाळ करत दहशत माजवली. तिथून जाताना आर के हॉटेल समोर आणि त्यापुढील रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. आजूबाजूच्या दुकानदारांना धमकावले. त्यामुळे दुकानदारांनी त्यांची दुकाने बंद करून घेतली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.