Moshi – व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हे महत्वपूर्ण साधन! – सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे

एमपीसी न्यूज – व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हे (Moshi) महत्वपूर्ण साधन असून कोणताही घटक त्यापासून वंचित राहू नये, यासाठी भटक्या विमुक्त वस्त्यांमधील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय करून रोटरी क्लब व जनसेवा फाउंडेशन हे सामाजिक उत्तरदायित्व स्वीकारून एक महत्त्वपूर्ण कार्य करीत असल्याचे मत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी व्यक्त केले.

रोटरी क्लब ऑफ पिंपरी यांच्यावतीने मोशी येथील रस्त्यांवर (Moshi) पालात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “शाळा आपल्या दारी” हा उपक्रम जनसेवा फाउंडेशनच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते आज करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

Pune : महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर नाही; महारष्ट्रात हजारो कोटींची गुंतवणूक – मंत्री उदय सामंत

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ पिंपरी चे अध्यक्ष डॉ. मनीष फरांदे होते. यावेळी माजी अध्यक्ष संजय प्रधान, वस्तीतील 50 पेक्षा अधिक विद्यार्थी, रोटरी क्लब ऑफ पिंपरीचे पदाधिकारी नरेंद्र सेठी, अभिजीत शिंदे, सदानंद नायक, आनंद संपत, सूर्यकांत जाधव, आनंद संपत, कुशल शहा, रोहन रोकडे यांच्यासह जनसेवा फाउंडेशनच्या शिक्षकवृंद दीपिक्षा चौबे, ज्ञानेश्वर सर आदी मान्यवर उपस्थित होते.

वंचित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगत शिक्षण हे सर्वांना प्रगतीचे दालन खुले करत असते, “जो शिकेल तोच पुढे टिकेल” असे उद्गारही सहाय्यक आयुक्त बोदडे यांनी यावेळी काढले.

रोटरी क्लब ऑफ पिंपरी च्या अंतर्गत बाल-भिकारी मुक्त स्मार्ट सिटी बनवण्यासाठी पिंपरी चिंचवड शहराच्या विविध विभागांमध्ये सहज उभारणी करता येतील अशा (पोर्टेबल) शाळा उभारण्यात येत आहेत. संस्थेचे माजी अध्यक्ष संजय प्रधान यांच्या पुढाकाराने शहरांमध्ये अशा प्रकारच्या हॅप्पी स्कूल तयार होत आहेत. शहरामध्ये आलेल्या निर्वासित कुटुंबीयांच्या मुलांसाठी ही सोय करून त्यांना एक सुजाण व जबाबदार नागरिक बनवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

 

आज तापकीर वस्ती भोसरी येथे पोर्टेबल हॅप्पी स्कूल चे उद्घाटन करण्यात आले. यासाठी जनसेवा फाउंडेशन पुणे यांच्या सहकार्याने शिक्षक उपलब्ध करून देण्याचे काम केले जात आहे. रोटरी क्लब ऑफ पिंपरीच्या या उपक्रमासाठी तापकीर नगर येथील रहिवासी आकाश काळोखे यांनी या शाळेसाठी त्यांच्या मालकीची जागा मोफत उपलब्ध करून दिली, त्याबाबत त्यांचा सत्कार अण्णा बोदडे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी रोटरी क्लबच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना युनिफॉर्म वाटण्यात आले. श्रीकृष्णानंद राम मारुती विद्याश्रम या संस्थेमार्फत सर्व मुलांना वह्यांचा वाटप करण्यात आले तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील पार पडला.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.