Moshi News: एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याला मोशी ग्रामस्थांकडून 50 बॅरीगेट्सची मदत

एमपीसी न्यूज – ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज यात्रेनिमित्त मोशी ग्रामस्थांकडून लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात आला आहे. मोशी ग्रामस्थांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याला 50 ट्राफिक बॅरीगेट देण्यात आले.

यावेळी मोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारी, पोलीस निरीक्षक श्री पाटील, उपनिरीक्षक अमरदिप पुजारी उपस्थित होते.

महाशिवरात्रीपासून मोशीचे ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज यात्रा सुरु होते. यानिमित्त मोशी ग्रामस्थांच्या वतीने एमआयडीसी पोलीस ठाण्याला 50 ट्राफिक बॅरीगेट देण्यात आले. मोशीतील वाहतूक सुरळीत होण्याच्या कामासाठी या बॅरीगेटचा उपयोग होणार आहे.

मोशी ग्रामस्थ विविध उपक्रम राबवितात. भंडारा यात्रेनिमित्त महाप्रसादासाठी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून भाविक येत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. वाहतूक नियंत्रण, दर्शन बारी, विविध सण यासाठी या बॅरीगेटचा उपयोग होईल. बॅरीकेट दिल्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारी यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.