Moshi : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय केल्या प्रकरणी एकाला अटक, एका पीडित महिलेची सुटका

एमपीसी न्यूज – स्पा सेंटरच्या नावाखाली (Moshi) वेश्या व्यवसाय केल्याप्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने एकाला अटक केली आहे. तर एका पीडित महिलेची सुटका केली आहे. हा सारा प्रकार मोशी येथे सुरू होता.

ही कारवाई शुक्रवारी (दि.18) रात्री अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने केली. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात विशाल तानाजी माने (वय 26, रा.  जाधववाडी) केशव ज्ञानोबा वाघमारे (वय 38, रा. जाधववाडी) व एक महिला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vadgaon Maval : शेतीपूरक व्यवसायासाठी एचडीएफसी बँक शेतकऱ्यांच्या पाठीशी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलेला पैशाचे आम्हीच दाखवून स्पा सेंटरच्या नावाखाली तिच्याकडून विषय व्यवसाय करून घेत होते. ही बातमी मिळताच पिंपरी चिंचवड (Moshi) पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी स्पा सेंटरवर छापा टाकत संबंधित आरोपीला अटक केली तर पीडीतेचे सुटका केली आहे याप्रकारे एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

youtube.com/watch?v=AZq9QmLmZgI

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.