Moshi : बुध्दी आणि विचार यांचे एकत्रीकरण म्हणजे गणेशोत्सव- वेदांताचार्य सुभाष महाराज गेठे

एमपीसी न्यूज- भारतीय संस्कृती ही उत्सवप्रिय संस्कृती आहे .या संस्कृतीमध्ये लोकमान्य टिळकांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे या उद्देशाने शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरु केले. संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा प्रसार केला. त्याला राष्ट्रीय एकात्मतेची जोड दिली. म्हणून गणेशोत्सवाला अनन्यसाधारण अस महत्व आहे अस प्रतिपादन वेदांताचार्य सुभाष महाराज गेठे यांनी केले.

मोशी प्राधिकरण येथील संत नगर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेला सार्वजनिक गणेशोत्सवात प्रबोधन करताना ते बोलत होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल (नाना) वाळुंज, सचिव अरुण इंगळे ,मारुती गायकवाड ,राजेश किबीले, सुरेश फरताळे, अनिल जगताप, कैलास आवटे, राजेश भट, दिगंबर ढोकले, संजय आहेर यांच्यासमवेत बहुसंख्येने भाविक उपस्थित होते.

गेठे महाराज म्हणाले की, उत्सव हा सृष्टीतला प्रत्येक घटकाला आवडतो. मनामध्ये असलेले नकारात्मक विचार काढुन टाकण्यासाठी आपण गणेशाची पूजा करतो. बुध्दी आणि विचार यांचे एकत्रीकरण म्हणजे गणेशोत्सव होय, असही ते म्हणाले.

यावेळी महिला सभासदांच्या वतीने आरती करण्यात आली. प्रवचनानंतर आयोजित केलेला महाप्रसादाचा सुमारे दीड हजार भाविकांनी लाभ घेतला.
मंडळाच्या वतीने ‘कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, करूया सर्व जीवांचे रक्षण’ हा पर्यावरणपूरक देखावा सादर करण्यात आला आहे. गेली 11 वर्षं मंडळाच्या वतीने पर्यावरणपूरक देखावे सादर केले जात आहेत. तसेच महाराष्ट्रातील विविध गडकिल्ल्यांवर वृक्षारोपण पर्यावरण तसेच प्लास्टिकमुक्त अभियान राबविले जात आहे. विघ्नहर्ता पुरस्काराने मंडळाचा सन्मान करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.