Moshi: मोशीतील कचरा डेपो रात्रीही सुरू राहणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा गोळा करण्याचे कामकाज रात्रपाळीमध्येही सुरु राहणार आहे. त्यामुळे या वाहनांच्या फे-या मोशी डेपोपर्यंत दिवसरात्र सुरु राहणार आहेत. केवळ कचरा वाहतूक कामकाजाच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. गोळा केलेला कचरा जमा करण्याकरिता कचरा डेपो 24 तास कार्यान्वित ठेवणे आवश्यक आहे. कचरा संकलनाचे काम अहोरात्र सुरु राहणार असून मोशीतील कचरा डेपो रात्री देखील सुरु राहणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करुन मोशीतील कचरा डेपो येथे नेण्यात येतो. कचराकुंड्या आणि कचरा विलीनीकरण केंद्रात जमा झालेला कचरा मोशी कचरा डेपो येथे वाहून नेण्यासाठी महापालिकेकडे सध्या विविध प्रकारची एकूण 350 वाहने आहेत. तरीही या वाहनांमार्फत दिवसभरात कचरा उचलणे शक्‍य होत नाही.

  • ही बाब लक्षात घेऊन कचरा गोळा करण्याचे कामकाज रात्रपाळीतही सुरू ठेवण्याचा घेण्यात आला आहे. शहरातील कच-याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन होण्यासाठी मोशी कचरा डेपो येथे सुमारे 81 एकर जागा राखीव ठेवण्यात आली आहे. शहरात प्रति दिन सुमारे 811.1 टन कच-याची निर्मिती होते. दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातून वाहनांद्वारे घनकचरा मोशी डेपोत आणला जातो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.