MPL 2023 – महाराष्ट्र प्रीमियर लीग होणार हाय प्रोफाइल; केदार जाधव, ऋतुराज गायकवाड घेणार सहभाग

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र क्रिकेट अससोसिएशन तर्फे (MPL 2023) होणाऱ्या महाराष्ट्र प्रीमियर लीगची (एमपीएल) बरेच प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या वर्षी या लीगमध्ये नुसते मनोरंजन आणि उत्कृष्ट खेळी नसून बरेच हाय प्रोफाइल खेळाडूसुद्धा स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत. पुणे, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर व रत्नागिरी या गावांचे संघ एमपीएलमध्ये सहभाग घेणार आहेत.

पुण्याचा कर्णधार ऋतुराज गायकवाड असणार आहे. नुकतेच आयपीएल जिंकून आल्यामुळे त्याचा आत्मविश्वास हा शिखरावर असेल आणि त्याच्याकडून तमाम चाहते खूप अपेक्षा लावून आहेत.

भारताचा अष्टपैलू केदार जाधव हा कोल्हापूरच्या संघाकडून खेळणार आहे व त्याला त्याचा आयपीएलमधल्या पुनरागमनाची चांगले व्यासपीठ मिळाले आहे. सनरायझर्स हैद्रबादचा आक्रमक सलामी फलंदाज राहुल त्रिपाठी हा सुद्धा नाशिकच्या संघाकडून खेळणार आहे. युवा खेळाडू विकी ओस्तवाल हा सोलापूरकडून तर राजवर्धन हंगरगेकर हा छत्रपती संभाजीनगरकडून खेळणार आहे.

एमपीएलमुळे बऱ्याच युवा खेळाडूंना स्वतःला सिद्ध करायची संधी मिळेल (MPL 2023) व त्यांच्यासाठी आयपीएल, रणजी ट्रॉफी, विजय हजारे व देवधर ट्रॉफी सारखे पुढचे दरवाजे देखील उघडतील. या हाय प्रोफाइल खेळाडूंमुळे चाहत्यांच्या या लीग कडून बऱ्याच अपेक्षा आहे.

Pune : अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयांचे स्थलांतर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.