Mulshi : श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण जिंकला तो कृष्णच; सुनेत्रा पवार यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Mulshi) यांच्या सख्या भावाने आणि वहिनीने साथ सोडल्यावर आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी भाष्य केले आहे. त्या बारामती येथे लोकसभेच्या उमेदवार असून त्यांनी पुण्यात दौरे सुरू केले आहेत. या दरम्यान त्यांनी केलेली फेसबुक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. यामध्ये त्यांनी  श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण जिंकला तो कृष्णच. अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे. 

त्या आज सहाव्यांदा भोर वेल्हे मुळशी विधानसभा मतदार संघात सदिच्छा भेटीसाठी दखल झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी त्या म्हणाल्या, की महायुतीतील इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील विकासकामाबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पक्षीय राजकारणा पलिकडचे, व्यापक हिताचे अनुभव सांगितले. जनतेला 24 तास भेटणारे दादा आहेत, कधीही फोन (Mulshi ) केला तर त्याला प्रतिसाद देणारे दादा आहेत, आपण सारे जण दादांचे भाऊ आहोत, श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण जिंकला तो कृष्णच.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, शिवसेना तालकाप्रमुख अमोल पांगारे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष सुनिल गायकवाड, भालचंद्र जगताप, रणजीत शिवतरे, चंद्रकांत बाठे, विक्रम खुटवड, बाळासाहेब गरुड, विद्याताई पांगारे, नीलम झांजले, अर्जुनराव अहिरे, गणेश निगडे, महेंद्र भोरडे यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.