Vijay Shivtare : महायुती वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा पुढाकार; विजय शिवतारे यांना दाखवणार बाहेरचा रस्ता?

एमपीसी न्यूज : शिवसेनेचे नेते विजय शिवतारे हे माघार (Vijay Shivtare) घेण्यास तयार नसल्याने आता एकनाथ शिंदे यांनीच पक्षाच्या वतीने कारवाई करण्यासंदर्भात पावले उचलली असल्याचे समजले आहे. त्यांची मनधरणी स्वत: एकनाथ शिंदे यांनी करूनही विजय शिवतारे काही अजित पवार यांच्यासाठी मागे हटत नसल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे आता शिंदेच ठोस पावले उचलून महायुती वाचवण्यासाठी पुढाकार घेणार आहेत. 

महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील जागावाटप अद्याप निश्चित झालेले नाही. दरम्यान, महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे सरकार अडचणीत आले आहे. शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली.  शिवतारे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधत बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्याची शपथ घेतली. त्यावर राष्ट्रवादीने रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने त्यांना (विजय शिवतारे) बडतर्फ न केल्यास सत्ताधारी महायुतीतून बाहेर पडू, अशी सूचनाही केली होती.

Mulshi : श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण जिंकला तो कृष्णच; सुनेत्रा पवार यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. यामुळे अजित पवार गट दुखावला गेला. यावेळी शिंदे यांनी आपल्याला युतीधर्म पाळला पाहिजे, असा सल्ला शिवतारे यांना दिला होता. पण शिवतारे काही मागे हटेना. , शिवसेनेकडून विजय शिवतारे यांना लवकरच पक्षाच्या शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी नोटीस पाठवली जाईल. यानंतरही विजय शिवतारे यांनी पक्षादेश मानला नाही तर त्यांना शिवसेनेकडून (Vijay Shivtare) निरोपाचा नारळ दिला जाईल, असे सांगितले जात आहे. तर यावर मला कोणतीही नोटिस न आल्याचे शिवतारे यांनी स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.