Mumbai : लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यात सव्वा लाख गुन्हे; 24 हजार जणांना अटक

Around 1.25 lakh cases in the state for violating the administration's order during the lockdown; 24,000 arrested

एमपीसी न्यूज – कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यात आजवर एक लाख 23 हजार 637 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये 23 हजार 893 जणांना अटक करण्यात आली आहे.

23 मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कठोर कारवाई करण्यात येत आहे.

या काळात पोलिसांनी 80 हजार 532 वाहने जप्त केली आहेत. तर गुन्हेगारांकडून 6 कोटी 78 लाख 9 हजार 891 इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी एक हजार 332 गुन्हे दाखल झाले आहेत. राज्यभरात 3 हजार 99 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

त्यातील एक हजार 628 पोलीस पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 34 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यानच्या कालावधीत पोलिसांवर हल्ल्याच्या 262 घटना घडल्या आहेत. त्यात 845 जणांना अटक झाली आहे.

पोलिस हेल्पलाईन 100 वर कोविड-19 च्या कॉलमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आजवर एक लाख 687 कॉल 100 क्रमांकाच्या हेल्पलाईनवर आले आहेत.

आतापर्यंत 5 लाख 86 हजार 967 लोकांना क्वारंटाईन केले आहे. तर 718 जण क्वारंटाईनचे उल्लंघन करताना आढळून आले आहेत. उल्लंघन करणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

राज्यात पावणे अकरा लाखतळीरामांना मिळाली घरपोच मदिरा

राज्यात 15 मे पासून 10 लाख 78 हजार 121 ग्राहकांना घरपोच मद्य पुरविण्यात आले आहे. अशी माहिती उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली आहे.

राज्यात 7 हजार 710 मद्यविक्री दुकाने सुरू आहेत. 1 मे पासून 1 लाख 10 हजार 763 ग्राहकांना मद्यसेवन परवाने मंजूर करण्यात आले आहेत.

अवैध मद्य विक्री व वाहतूक रोखण्यासाठी केलेल्या धडक कारवाईत आतापर्यंत 7 हजार 452 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून त्यात 3 हजार 450 आरोपींना अटक झाली आहे. यामध्ये एकूण 18 कोटी 99 लाखांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.