Mumbai : बिग बी अमिताभ बच्चन यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा

Mumbai : Big B Amitabh Bachchan wishes Ramadan to the Muslim Brotherhood

एमपीसी न्यूज – उद्या मुस्लिम बांधवांचा पवित्र सण म्हणजे रमजान ईद आहे. त्यानिमित्त अमिताभ बच्चन यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी बिग बी म्हणाले, “तुम्हा सगळ्यांना ईदच्या मनापासून शुभेच्छा. निरोगी आयुष्य, मित्र-परिवार या सगळ्यांसाठी या दिवशी प्रार्थना करा. आपण प्रेम, शांती आणि बंधुभाव यांच्या जोरावर एकमेकांची साथ देऊ”

रमजान हा मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना. या महिन्याची सांगता ईदीने होते. संपूर्ण महिनाभर  मुस्लिम बांधव रोजे अर्थात उपवास करतात. दिवसभर पाण्याचा घोट देखील न घेता उपवास केला जातो. त्यामुळे रमजानचा महिना मुस्लीम बांधवांसाठी खास असतो. त्यातच रमजान ईदच्या दिवशी मुस्लीम बांधव एकमेकांची गळाभेट घेत शुभेच्छा देतात.अमिताभ बच्चन यांची पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांचे आभार मानले आहेत. तसंच त्यांना ईदच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. बिग बी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असून बऱ्याच वेळा ते चाहत्यांशी संवाद साधत असतात. यात सध्या ते जनतेला घरात राहण्याचं आणि काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत. तसं करोनाविषयी चाहत्यांमध्ये जनजागृतीदेखील करत आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ईद घरीच राहून साजरी करण्याचे आवाहन अनेकजण करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.