Mumbai : महाराष्ट्रासाठी चौथ्या लॉकडाऊनची नियमावली जाहीर ; जाणून घ्या काय सुरू राहणार, काय बंद ?

एमपीसी न्यूज – राज्यासह देशभरात चौथा लॉकडाऊन सुरु झाला असून, या लॉकडाऊनची नियमावली आता राज्य सरकारने जाहीर केली आहे. कोणत्या झोनमध्ये काय सुरु राहील आणि काय बंद असेल, हे यामध्ये सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकारने 17 मे रोजी पत्रक काढून लॉकडाऊन 4.0 ची घोषणा केली आहे.

केंद्रानेही त्याच दिवशी लॉकडाऊन वाढवला. मात्र, केंद्राने या चौथ्या लॉकडाऊनची नियमावली ठरवण्याचे अधिकार राज्यांना दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने नियमावली जारी केली आहे. आता हे नियम 22 मे पासून 31 मेपर्यंत लागू राहतील.

# काय सुरु राहणार ?

– मालवाहतुकीला सर्वत्र परवानगी.

– अत्यावश्यक दुकानांना सर्वत्र परवानगी.

– दारु दुकाने (रेड झोनमध्ये होम डिलिव्हरीला परवानगी) मात्र कंटेनमेंट झोनमध्ये बंद राहणार, अन्य झोनमध्ये सुरु राहणार.

– वैद्यकीय दवाखाने कंटेनमेंट झोन वगळता सर्वत्र सुरु राहणार.

– कंटेनमेंट झोन वगळता हॉटेलमधून होम डिलिव्हरीला परवानगी.

– कंटेनमेंट झोन वगळता आरटीओ कार्यालये सुरु राहणार.

– ऑरेंज, ग्रीन झोनमध्ये टॅक्सीमध्ये चालकासह दोघांना परवानगी.

– ई-कॉमर्स सेवांना कंटेनमेंट झोन वगळता परवानगी.

-कंटेनमेंट झोन वगळता बँका, वित्तीय सेवा सुरु राहणार.

– कंटेनमेंट झोन वगळता कुरियर पोस्टल सेवा सुरु राहणार.

– अन्य झोनमध्ये खासगी बांधकाम साइटसला परवानगी.

– रेड झोनमध्ये शहरी भागात एकल दुकानांना मर्यादीत परवानगी.

# काय बंद राहणार ?

– ट्रेन, मेट्रो, विमान सेवा सर्वच झोनमध्ये बंद राहणार.

– आंतरराज्य रस्ते वाहतूक बंदच राहणार.

– रेड झोनमध्ये शेती कामांना परवानगी नाही.

– सलून, स्पा सर्वच झोनमध्ये बंदच राहणार.

– टॅक्सी, रिक्षा रेड झोनमध्ये परवानगी नाही.

– रेड झोनमध्ये खासगी बांधकाम साईटसना परवानगी नाही.

– रेड झोनमध्ये खासगी कार्यालयांना परवानगी नाही.

-शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल, हॉटेल, मॉल, प्रार्थनास्थळे बंदच.

– रेड झोनमध्ये चार चाकी, दोन चाकी वाहनांना अत्यावश्यक असेल तरच परवानगी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.