Avinash Bhosale : अविनाश भोसले यांना मोठा दिलासा, मालमत्ता ताब्यात न घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

एमपीसी न्यूज – पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांची मालमत्ता जप्त करू नये असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court)  दिले आहेत. अविनाश भोसले सध्या येस बँक डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी अटकेत आहे. अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) मुंबई उच्च न्यायालयाने त्याच्या मालमत्ता ताबा न घेण्याचे निर्देश दिले आहेत. 

One Person Kidnapping: व्यक्तीचे अपहरण करून मागितली 25 लाखांची खंडणी

काही दिवसांपूर्वीच प्रेवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट अंतर्गत निर्णय घेणाऱ्या प्राधिकरणाने अविनाश भोसले आणि इतरांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. त्यानुसार मनी लोन किंग च्या गुन्ह्याच्या संदर्भात ईडीकडून मालमत्ता जप्तीची नोटीस पाठवण्यात आली होती.

 

पुण्यातील अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांचा कार्पोरेट कार्यालय असलेली इमारत रिकामी करण्यास सांगण्यात आली होती. त्यानंतर भोसले यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) हा निर्णय दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.