Mumbai : राज्यात 490 कोरोनाबाधित, 26 जणांचा मृत्यू; दिवसभरात 6 बळी

एमपीसी न्यूज : देशभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना इकडे महाराष्ट्रातही कोरोनबाधित रुग्ण वाढत आहेत. आज राज्यभरात एकूण 67 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 490 वर पोहचला आहे. तर कोरोनाच्या बळींची आजची संख्या 26 वर पोहोचली आहे.  त्यात आजच्या बळींचा आकडा 6 इतका आहे.  त्यामुळे सरकारसह नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

आजच्या कोरोनाबळींमधे वसई-विरार, बदलापूर-ठाणे, जळगाव आणि पुणे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा आज मृत्यू झाला. तर एकट्या मुंबईत कोरोनाने दोन बळी घेतले आहेत. राज्यात आज 50 जण कोरोनमुक्त होऊन आपआपल्या घरी गेले आहेत.

राज्यातील जिल्हा व महापालिकानिहाय कोरोना रुग्णांचा तपशील (कंसात मृतांची संख्या)

मुंबई    – 278  (19)

पुणे ( शहर व ग्रामीण) – 70 (2)

सांगली – 25

ठाणे मंडळातील इतर जिल्हे व महापालिका  -55 (3)

नागपूर – 16

अहमदनगर – 20

बुलडाणा – 5 (1)

यवतमाळ – 4

सातारा, औरंगाबाद –  प्रत्येकी 3

कोल्हापूर, रत्नागिरी  –  प्रत्येकी 2

सिंधुदुर्ग, गोंदिया, नाशिक, उस्मानाबाद, वाशीम, जळगाव – प्रत्येकी 1

दरम्यान, देशातही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. कारण गेल्या 24  तासांत देशात एकूण 478  नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आहे आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 2547 वर पोहोचला आहे.

तर आजपर्यंत कोरोनामुळे संपूर्ण देशभरात 62  जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सध्या 2322 सक्रिय कोरोना बाधित रुग्ण भारतात असून, 162  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.