New Delhi : देशात 24 तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येत 478ने वाढ ; एकूण रुग्ण 2547

एमपीसी न्यूज : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. कारण गेल्या 24  तासांत देशात एकूण 478  नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आहे आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 2547 वर पोहोचला आहे.

त्यामुळे सरकारसह नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. तर आजपर्यंत कोरोनामुळे संपूर्ण देशभरात 62  जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सध्या 2322 सक्रिय कोरोना बाधित रुग्ण भारतात असून, 162  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशभरात कोरोनच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना इकडे महाराष्ट्रातही कोरोनबाधित रुग्ण वाढत आहेत. आज राज्यभरात एकूण ६७ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता ४९० वर पोहचला आहे.

तर कोरोनाच्या बळींची आजची संख्या ६ इतकी आहे. यामध्ये वसई-विरार, बदलापूर-ठाणे, जळगाव आणि पुणे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा आज मृत्यू झाला. तर एकट्या मुंबईत कोरोनाने २ बळी घेतले आहेत. राज्यात आज ५० जण कोरोनमुक्त होऊन आपआपल्या घरी गेले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.