Mumbai : ‘कोरोना’ व्हायरसचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राची आरोग्य यंत्रणा सज्ज

एमपीसी न्यूज – चीन देशातून नव्याने मोठ्या प्रमाणात पसरणाऱ्या ‘कोरोना’ लागण व्हायरसचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाय राबविण्यात येत आहेत. यासाठी पुण्यात कंट्रोल रूम बनविण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येत आहे.

भारत देशात दिल्ली, केरळ आणि तेलंगणा येथे ‘कोरोना’ व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे.  त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. याचा प्रादुर्भाव रोखणे, हाच प्रमुख उपाय ग्राह्य धरण्यात येत आहे. त्यामुळे देशासह, महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य यंत्रणेनेही विविध कामे हाती घेतली आहे.

यात जपान, चीन, हाँगकाँग आदी देशातून आलेल्याचे प्रथम स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात वार्ड बनविण्यात येणार आहेत. याचबरोबर, पुण्यात याची कंट्रोल रूम बनविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.