Talegaon Station : ‘जागतिक महिला दिन’निमित्त श्री डायग्नोसिस सेंटर येथे ‘निदान फी’वर 40 टक्के सूट!

एमपीसी न्यूज – तळेगाव स्टेशन येथील प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट तज्ज्ञ डॉ. श्रीहरी डांगे यांच्या श्री डायग्नोसिस सेंटरच्या वतीने 8 मार्च या ‘जागतिक महिला दिन’ निमित्त महिलांसाठी निदान ‘फी’मध्ये 40 टक्के सूट जाहीर केली आहे. हि सवलत सेंटरमध्ये दि 1 मार्च 2020 ते 31 मार्च 2020 या कालावधीत असणार आहे, असे सेंटरच्या वतीने सांगण्यात आले आहे.

याबाबत डांगे यांनी सांगितले कि, या सवलत सेंटरमध्ये सर्व प्रकारच्या मॅमोग्राफी व मॅमोसोनोग्राफीसाठी आवश्यक उपलब्ध साधन सुविधा उपलब्ध आहे. तसेच ब्रेस्ट कॅन्सर निदान करणारे मावळ तालुक्यातील एकमेव अत्याधुनिक सेंटर आहे.

‘जागतिक महिला दिन’ हा दिवस सर्वच महिलांचा सन्मान करण्याचा दिवस असून आजच्या काळातील जवळजवळ सर्वच महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात उत्तम कार्य करत आहेत. आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून त्या आपल्या पायावर भक्कमपणे उभ्या राहत आहेत, हे सर्व करत असताना त्यांनी आपले आरोग्य सांभाळणे आणि निगा राखणे आवश्यक आहे.

महिलांनी आपली आरोग्य तपासणी नियमित केली पाहिजे, कारण संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर अवलंबून असते. घरातील स्त्री आजारी असेल तर सर्व कुटुंब विस्कळीत होते. महिलांमध्ये विविध आजारांचे प्रमाण वाढत असून महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण मोठया प्रमाणात दिसून येत आहे. ब्रेस्ट कॅन्सरचे निदान मॅमोग्राफीद्वारे केले जाते.

स्त्रीयांनी आपली आरोग्य तपासणी नियमित केल्यास हा आजार टाळता येऊ शकतो आणि निरोगी व सुखी जीवन जगता येऊ शकते. पर्यायाने सर्व समाज सुखी होऊ शकतो, म्हणून डॉ.डांगेज श्री डायग्नोसिस सेंटरचे संस्थापक-अध्यक्ष यांनी आपल्या सेंटरमध्ये दि 1 मार्च 2020 ते 31 मार्च 2020 या कालावधीत सर्व महिलांसाठी सर्वच प्रकारच्या मॅमोग्राफी व मॅमोसोनोग्राफीवर ‘निदान फी’वर 40 टक्के घवघवीत सूट दिली जाणार आहे. या संधीचा सर्वानी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट तज्ज्ञ डॉ.श्रीहरी डांगे यांनी केले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.