Pune : प्रेयसीने प्रियकराचा कोयत्याने वार करून केला खून!

एमपीसी न्यूज – लग्न करीत नसल्याच्या कारणावरून प्रियसीनेच प्रियकराचा कोयत्याने गळा कापून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरातील नऱ्हे गावत घडली आहे. घटनेनंतर आरोपी तरुणी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाली.

महंतेश बिरादार (27 वर्षे, मूळ रा. संख, ता.जत, जि.सांगली) असे खून करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. तर, याप्रकरणी पोलिसांनी 24 वर्षीय तरुणी (प्रेयसी) स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, महंतेश आणि आरोपी तरुणी हे मित्र होते. तिनेही नवले हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम करत होती. गेल्या चार-पाच वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दोघांनी आळंदीत विवाहही केला होता. परंतु त्यानंतर तो तिला भेटावयास टाळाटाळ करीत होता. तिने यापूर्वी सिंहगड पोलीस ठाण्यात त्याच्याविषयी तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर सोमवारी रात्री तो दारू पिऊन तिच्या घरी आला.

दरम्यान, रात्री त्याने (आरोपी तरुणी) तिला माझे लग्न झाल्याचे सांगितले, यावरून त्यांच्या दोघांत मोठा वाद झाला. त्यानंतर महंतेश झोपी गेला असता पहाटे 4.30च्या सुमारास तिने कोयत्याने त्याच्या मानेवर वार करून त्याचा खून केला. खून केल्यानंतर तिने पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. त्यानंतर तिने तिच्या गावी असलेल्या वडिलांना खून केल्याचे फोन करून कळविले. वडिलांनी पोलीस ठाण्यात जाण्याविषयी सांगितल्याने तिने स्वतः पोलीस चौकीत हजर राहून मी खून केल्याचे सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.