Mumbai : ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचे निधन

एमपीसी न्यूज- आपल्या सुरेल गायकीने आणि सोप्या सहजपणे गुणगुणता येणाऱ्या चालींमुळे मराठी संगीत क्षेत्रामध्ये वेगळे स्थान पटकावणारे ज्येष्ठ संगीतकार कवी यशवंत देव (वय 91) यांचे आज, मंगळवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘जीवनात ही घडी’, ‘स्वर आले दुरुनी’, ‘असेन मी नसेन मी’, ‘अखेरचे येतील माझ्या…’ ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘तिन्ही लोक आनंदाने’, अशा अनेक गीतांना संगीताचा साज चढवून यशवंत देव यांनी भावगीतांना वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. चित्रपटाबरोबरच अनेक नाटकासाठीही त्यांनी संगीत दिले होते.

यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली काही निवडक गाणी
– या जन्मावर या जगण्यावर
– जीवनात ही घडी अशीच राहु दे
– भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
– दिवस तुझे हे फुलायचे
– येशिल येशिल येशिल राणी
– अशी पाखरे येती आणिक
– असेन मी नसेन मी
– कुठे शोधिसी रामेश्वर
– ठुमकत आल्या किती गौळणी
– काही बोलायाचे आहे
– डोळ्यात सांजवेळी आणू
– गणपती तू गुणपती तू
– कुणि काहि म्हणा
– कामापुरता मामा
– करिते जीवनाची भैरवी

कवी यशवंत देव यांनी लिहिलेली काही गाणी
– जीवनात ही घडी अशीच राहू दे
– कोटि कोटि रूपे तूझी कोटी सूर्य चंद्र तारे
– माणसांच्या गर्दीत माणूस माणसाला शोधत आहे
– कामापुरता मामा
– रात्रिच्या धुंद समयाला
– स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी
– अरे देवा तुझी मुले अशी
– दिवाळी येणार अंगण सजणार
– मने दुभंगली म्हणून जोडता येत नाही
– रात्रिच्या धुंद समयाला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.