Mumbai: नवीन सहा रुग्णांची भर पडल्याने राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 159 वर!

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात सहा नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या 159 झाली आहे. मुंबईत पाच तर नागपूरमध्ये एक नवीन रुग्ण आढळला आहे.

एकूण कोरोनाबाधित 159 पैकी तीन परदेशी नागरिक आहेत. राज्य सरकारच्या आरोग्यखात्याने ही माहिती दिली आहे. आतापर्यंत राज्यात एकूण पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात 25 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच घरातच थांबा, करोनाला रोखा असं आवाहनही करण्यात आलं आहे. तरीही महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.