Mumbai: राज्यात नवे 60 रुग्ण, कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1078

एमपीसी न्यूज – राज्यात आज नवीन 60 कोरोना पंझिटीव्ह रुग्ण मिळाल्याने कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 1,078 झाली आहे. राज्यातील कोरोनाचा प्रसार कमी होण्याचे नाव घेत नसल्याने महाराष्ट्राच्या चिंतेत वाढच होत आहे. 

भारतात कोरोनाची सर्वाधिक लागण महाराष्ट्रात झाली आहे. सर्वाधिक रुग्ण व सर्वाधिक बळींची नोंद देखील राज्यातच आहे. विविध कडक उपाययोजना करूनही परिस्थितीत सुधारणा होताना दिसत नाही.

महाराष्ट्रात आज (बुधवारी) बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात 44 रुग्णांचा कोरोना निदान चाचणीचा अहवाल ‘पॉझिटीव्ह’ आला आहे. पुणे महापालिका क्षेत्रात नऊ, नागपूरला चार तर अहमदनगर, अकोला, बुलडाणा येथे प्रत्येकी एका नव्या रुग्णाची नोंद झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.