Mumbai News : खुशखबर ! दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यातील जिम, व्यायामशाळा सुरु होणार

एमपीसीन्यूज : राज्यातील जिम, व्यायामशाळा सुरु करण्याची मागणी राज्य सरकारने मान्य केली असून आता दसऱ्यापासून राज्यात जिम, व्यायामशाळा सुरु होणार आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी उपायोजना आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करुन, राज्यात जिम, फिटनेस सेंटर, व्यायामशाळा सुरु करण्यास मान्यता देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

जिम, व्यायामशाळा सुरु परवानगी देत असतानाच एसओपीचे काटेकोरपण पालन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज, शनिवारी जिम, फिटनेस सेंटर आणि व्यायाम शाळेंच्या प्रतिनिधींशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

यावेळी त्यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी उपायोजना आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करुन, राज्यात जिम, फिटनेस सेंटर, व्यायामशाळा सुरु करण्यास मान्यता देत असल्याचे जाहीर केले.

दरम्यान, जिम, फिटनेस सेंटर आणि व्यायाम शाळेंच्या प्रतिनिधींनी जिम, व्यायामशाळांना परवागनी मिळावी, यासाठी काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.