Pimpri Corona Update : शहरात आज 228 नवीन रुग्ण, 355 जणांना डिस्चार्ज, 16 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 209 आणि पालिका हद्दीबाहेरील 19 अशा 228 नवीन रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 85 हजार 323 झाली असून, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 355 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील 9 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 7 अशा 16 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात वाकड, पिंपळेसौदागर, संत तुकारामनगर, भोसरी, चिंचवड, काळेवाडी, किवळे, निगडी, शिरूर, जुन्नर, खेड, आळंदी, मुळशी येथील रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 85 हजार 323 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 81 हजार 107 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 1473 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 603 अशा 2076 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 2010 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.