Mumbai news: मराठा आरक्षणासंदर्भात अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल

एमपीसी न्यूज – मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठाकडे राज्य सरकारच्या वतीने आज (सोमवारी) विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती दिल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्याच्या विविध भागात आंदोलने सुरू झाली आहेत. आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी केली जात आहे.

सरकार विविध पर्यावावर विचार करत होते. त्यासाठी आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यावर सखोल चर्चा केली.

त्यांनतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठाकडे विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.