Mumbai News : शाहरूख खानच्या मुलगा आर्यन खानला 7 ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडी

एमपीसी न्यूज – क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर कालच आर्यन खानला एक दिवसाची एनसीबी कोठडी देखील सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज आर्यनसह इतर सात आरोपींना मुंबईतील किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने याबाबत निर्णय दिला असून, आर्यन खानबरोबर मुनमुन धमेच्या व अरबाज सेठ मर्चंट या दोघांना देखील सात ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे.

आर्यनच्या फोन चॅटमध्ये बऱ्याच गंभीर स्वरूपातील लिंक आढळून आल्या आहेत, ज्यांचा संबंध आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी देखील लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आर्यनने परदेशात असतानाही ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली आहे, त्याच्या चौकशीसाठी आर्यनची कोठडी आवश्यक आहे. असा एनसीबीच्या वकिलांनी दावा केला होता. तसेच, अरबाज मर्चंटकडे सहा ग्रॅम चरस आणि मुनमुन धमेच्याकडे पाच ग्रॅम चरस सापडले असल्याचं एनसीबीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं. या पार्टीच्या दोन आयोजकांना देखील एनसीबीकडून ताब्यात घेण्यात आलेलं आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.