Pimpri News: काँग्रेसकडून उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

एमपीसी न्यूज – भाजपच्या मंत्री पुत्राने उत्तरप्रदेश येथे आंदोलक शेतक-यांना गाडीने उडवल्याचा आरोप करत आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्याशी उत्तरप्रदेश पोलिसांनी केलेल्या बेजबाबदार वर्तनाविरोधात शहर काँग्रेसच्या वतीने आज (सोमवारी) उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले.

पिंपरी चौकात झालेल्या आंदोलनात इंटक, युवक काँग्रेस, सेवादल व एनएसयुआय या काँग्रेस पक्षाच्या आघाडी संघटनांनी भाग घेतला. यावेळी उत्तर प्रदेशातील भाजपा सरकार व केंद्रीतील मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या प्रसंगी सुरूवातीला या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलक शेतकरी बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

आंदोलनादरम्यान कैलास कदम म्हणाले, “देशात मोदी सरकार आल्यापासून नागरिकांवर विशेषतः शेतकरी व कामगार वर्गावर अन्याय होत आहे. त्यात आता भर म्हणून की काय या भाजप मंत्र्याच्या मुलाने उत्तरप्रदेश मधील आंदोलक शेतक-यांना मोटारीने चिरडले. त्यात सहा शेतक-यांचा मृत्यू झाला. आधी न्याय द्यायचा नाही. अन्याय करायचा, आंदोलन केले कि असे चिरडायचे यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आणि भाजपचा खरा चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आला आहे.

युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, “एका बाजूने युवकांवर बेरोजगारीने मरण्याची वेळ आली आहे. तर, दुस-या बाजूला हे असे शेतकरी आंदोलक वाहनांनी चिरडले जात असतील. तर, यापेक्षा दुर्दैवी व सरकारी तानाशाहीचा काळ यापूर्वी कधीही या देशाने पाहीला नाही. प्रियांका गांधी यांना बेकायदेशीरपणे अडवून उत्तरप्रदेश पोलिसांनी स्वतः कायद्याचा भंग केला आहे. ज्या प्रमाणे प्रियांका गांधी ज्या या देशाच्या नेत्या आहेत. त्यांच्याशी पोलीस वागले ते निश्चितच चीड आणणारे आहे. यालाच सत्तेचा गैर वापर व सत्तेची मस्ती म्हणतात.”

आंदोलनात पुणे जिल्हा इंटकचे अध्यक्ष डॅा. कैलास कदम, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पर्यावरण विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे, काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, एनएसयुआयचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. उमेश खंदारे, एनएसयुआयचे शहराध्यक्ष डॅा. वसीम ईनामदार, उत्तरप्रदेश काँग्रेस सेवादलाचे महासचिव सलमान जब्बारअली, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, एससी विभागाचे कार्याध्यक्ष विजय ओव्हाळ, सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष गणेश नांगरे, युवक काँग्रेसचे सरचिटणीस रवी नांगरे, पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी युवक अध्यक्ष नासीर चौधरी, चिंचवड विधानसभा युवक उपाध्यक्ष सौरभ शिंदे, अलोक लाड, विशाल सरवदे, अनिल सोनकांबळे, प्रकाश पठारे , सचिन कदम, रहीम चौधरी आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.