Pune News : पुणे शहरातही सलग 75 तास लसीकरण : महापौर मोहोळ

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उपक्रम

एमपीसी न्यूज – एकीकडे पुणे शहरात विक्रमी लसीकरण झाले असले तरी देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पुणे मनपा हद्दीत सलग 75 तास लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. महापालिकेच्या दोन केंद्रांवर सलग 75 तास डोस उपलब्ध करण्यात येत असून पुणेकरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

देशभरात यंदा ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. यात विविध उपक्रम राबवले जात असताना लसीकरण मोहिमेला व्यापकता देण्याचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून पुणे मनपा हद्दीत सलग 75 तास लसीकरण उपक्रम राबविण्यात येत आहे.

याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘पुणे मनपा हद्दीत अलीकडच्या काही आठवड्यात लसीकरणाने उत्तम वेग पडकला असून यात सातत्य आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची स्थिती नियंत्रित आहे. दुसरीकडे आपण महापालिकेचे मंगळवार पेठेतील कमला नेहरू हॉस्पिटल आणि कोथरुड येथील सुतार हॉस्पिटल या ठिकाणी सलग 75 तास लसीकरणाचा उपक्रम राबवत आहोत. आजपासून (मंगळवारी) या दोन्ही केंद्रांवर सलग 75 तास लसीकरण होणार आहे. लसीकरण न झालेल्या जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.