Mumbai News : काही जण सुपात, काही जण जात्यात- चंद्रकांत पाटल यांचा सूचक इशारा

एमपीसीन्यूज : अनिल देशमुख यांच्यावर शेवटी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. मुंबई, नागपूरसह त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या 10 ठिकाणी छापेमारी सुरू आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार कारवाई करत सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. अनिल देशमुख यांच्यावर जसे आरोप करण्यात आले होते अगदी तसेच आरोप अनिल परब यांच्यावर देखील करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची देखील सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत भारतीय जनताा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी “काही जण सुपात आहेत तर काही जण जात्यात आहेत” असे सांगत सूचक इशारा दिला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, यांनी अनिल देशमुख यांना केलेली अटक म्हणजे बीजेपीचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. परंतु परमवीर सिंग कोर्टात गेल्यानंतर हायकोर्टाने चौकशी करण्याचे आदेश दिले होते. आणि त्यानंतर ही कारवाई झाली. मात्र, हसन मुश्रीफ यांना कुठल्याही विषयावर पटकन प्रतिक्रिया देण्याची घाई झालेली असते.

परमवीर सिंग यांनी शंभर कोटीच्या वसुलीचा आरोप लावल्यानंतर अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागतो, त्यांची चौकशी सुरू होते, गुन्हा दाखल होतो, छापेमारी होते. परंतु सचिन वाजे याने ऑन पेपरवर अनिल परब यांच्या विरोधात पैसे गोळा करण्यासाठी धमकावल्याचा आरोप केला आहे.

त्यामुळे अनिल परब यांची देखील सीबीआय चौकशी झाली पाहिजे. परमेश्वर सगळ्यांचा बरोबर हिशोब करतो. आताच्या परिस्थितीत काहीजण सुपात आहेत तर काहीजण जात्यात आहेत असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी एक कविता वाचून दाखवली.

इतनी उचाई न देना प्रभू के, धरती पराई लगे !
नही चाहिये ऐसी शक्ती, जिसका निर्बल पर प्रयोग करू!
नही चाहिये ऐसा भाव की, किसी को देखकर जल जल मरू
पैसा ज्ञान मुझे ना देना, अभिमान मुझको होने लगे!
ऐसी चतुराई भी ना देना जो लोगो को छलने लगे!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.