Mumbai Police Get Faster: मुंबई पोलीस आता अधिक गतिमान; गृहमंत्री देशमुख यांच्या हस्ते पोलिसांसाठीच्या ‘सेगवे’चे उद्घाटन

Mumbai Police Get Faster: Mumbai Police is now faster; Home Minister Deshmukh inaugurates Segway for Police महाराष्ट्राचे पोलीस दल हे जागतिक पोलिसिंग स्टॅंडर्ड नुसार अत्याधुनिक सुसज्ज अशा साधन सामग्रीने भक्कम करण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरविले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

एमपीसी न्यूज – पोलीस विभागासाठी उपयुक्त अशा ‘सेगवे’चे (सेल्फ बॅलन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर) उद्घाटन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते काल (गुरुवारी) मरिन ड्राईव्ह येथे संपन्न झाले.

यावेळी आमदार रोहित पवार मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सह पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त दक्षिण विभाग निशिथ मिश्रा तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्राचे पोलीस दल हे जागतिक पोलिसिंग स्टॅंडर्ड नुसार अत्याधुनिक सुसज्ज अशा साधन सामग्रीने भक्कम करण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरविले आहे. त्यानुसार या सेग वे चे उद्घाटन करण्यात आले असल्याची माहिती देशमुख यांनी यावेळी दिली.

सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात अशा प्रकारची यंत्रणा पोलिसांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पोलिसाच्या मास्कला माईक लावण्यात येणार असून ते त्याद्वारे लोकांना गर्दीच्या ठिकाणी सुरक्षितते संदर्भात सूचना देऊ शकतील, तसेच त्यांच्या मदतीला पब्लिक अड्रेस सिस्टीम असलेले अत्याधुनिक ड्रोन देखील आहेत. त्याचाही उपयोग होऊ शकेल, असे देशमुख म्हणाले.

_MPC_DIR_MPU_II

मरिन ड्राईव्ह येथे पन्नास सेगवेचे उद्घाटन करण्यात आले. यातील दहा सेग वे हे वरळी साठी तर पाच नरिमन पॉइंट साठी आहेत. त्याचप्रमाणे बांद्रा, जुहू, वर्सोवा या ठिकाणी देखील हे सेग वे देण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.