Mumbai : मराठी तरुणांनो हीच संधी आहे, नंतर गळे काढू नका – केदार शिंदे

Mumbai: This is the opportunity for Marathi youth, then don't swallow - Kedar Shinde

एमपीसी न्यूज : करोनाची साथ सुरु झाली आणि सगळ्यात जास्त हाल झाले ते परप्रांतीय मजुरांचे. अगदी ‘ना घर का ना घाटका’, असी त्यांची स्थिती झाली. काही प्रमाणात अफवांवर विश्वास ठेवल्यामुळे देखील दुर्दैवी घटना घडल्या. आता त्यांना त्यांच्या घरी जाण्याचा मार्ग मोकळा होऊ लागला आहे. स्पेशल ट्रेन सोडण्यात येत आहेत.  याच पार्श्वभूमीवर निर्माता, दिग्दर्शक केदार शिंदे याने एक पोस्ट केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर गाजत आहे.

केदार शिंदेने सध्या आपापल्या राज्यात परतणाऱ्या कामगारांसंदर्भात एक फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने, ‘आता सर्व नोंदणी करून आपआपल्या गावाचा मार्ग धरतायत. @CMOMaharashtra आपल्याकडे त्यांचा data उपलब्ध झालाय.

मराठी तरुणांना हे दुसरे लोक करीत असलेल्या कामांची माहिती करुन द्यावी ! मराठी तरुणांना हीच संधी आहे. नंतर गळे काढून रडू नका.. त्यांनी काम हिसकावली !’ असे म्हटले आहे.

वस्तुस्थिती अशी आहे की, परप्रांतिय लोक इथे येऊन सर्व प्रकारची कामे न लाजता करतात. पण महाराष्ट्रातील तरुणांना ही श्रमाची कामे करण्याची लाज वाटते. नेमक्या याच गोष्टीवर बोट ठेवत केदारने महाराष्ट्रीयन तरुणांसमोर आरसा धरला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’, ही वृत्ती सोडून आता मोबाईलच्या मागे वेड्या झालेल्या तरुणाईने श्रमाच्या कामांची सवय लावली पाहिजे. थोडेसे अंतर्मुख होऊन विचार करायला हवा असे तर यानिमित्ताने केदारचे म्हणणे नसेल ना.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.