Mumbai: रोहित शर्मा, शिखर धवनला ‘इडीयट’ का म्हणाला?

Mumbai: Why did Rohit Sharma call Shikhar Dhawan an 'idiot'?

एमपीसी न्यूज – रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामी जोडीने भारतीय संघाला अनेक सामान्यात भक्कम सुरुवात करून दिली आहे. अनेक विक्रमही या जोडीच्या नावावर जमा आहेत. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरसोबत इन्स्टाग्राम लाईव्ह चॅटमध्ये बोलताना शिखर धवनला ‘इडीयट’ म्हणून संबोधित केले आहे.

शिखर धवन बद्दल बोलताना रोहित म्हणाला, धवन फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर चांगला खेळतो, पण ज्यावेळी फटकेबाजीची वेळ येते त्यावेळी तो त्यांच्यावर फारसा प्रहार करत नाही. त्याला कधीही पहिला चेंडू खेळायचा नसतो, ‘ही इज इडियट’ म्हणजे शिखर धवन वेडा माणूस आहे, त्याला कधीही पहिला चेंडू खेळायचा नसतो. त्याला फिरकी गोलंदाजीवर फटकेबाजी करायची नसते. कधीकधी तो खूप विचित्र वागतो.

कधीकधी तुम्ही सामन्यात एखादी रणनीती आखत असता आणि पाच सेकंदांनी हा माणूस विचारतो, काय म्हणत होतास? विचार कर, तुम्ही सामन्यात खूप तणावाखाली असता आणि हा माणूस असं काहीतरी बोलून जातो, अशा गोष्टींमुळे कधीकधी राग येतो, असे तो म्हणाला.

रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामी जोडीने भारतीय संघासाठी खेळताना 2013 ते 2020 या काळात मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित-शिखर या जोडीच्या नावावर 4902 एवढ्या धावा जमा आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.