Music Launch News : ‘सरला एक कोटी’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

एमपीसी न्यूज -सरला एक कोटी’ या चित्रपटाचे म्युझिक लॉन्च व ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला ( Music Launch News)आहे. हा सोहळा मुंबईत दिमाखात पार पडला.

नवलवाडीतील निरागस, सौंदर्याची खाण असलेली सरला आणि तिचा भोळा-भाबडा नवरा भिका यांच्या नशिबाची गोष्ट या चित्रपटात सांगण्यात आलेली आहे. पत्ते खेळण्यात तरबेज असलेला भिका डावात हारतो आणि आपल्या सुंदर बायकोला डावावर लावतो आणि मग पुढे काय होतं याची गोष्ट चित्रपटात सांगितली आहे. सरलाच्या भूमिकेत अभिनेत्री ईशा केसकर आणि भिकाच्या भूमिकेत ओंकार भोजने दिसणार आहे. या दोघांसोबत ( Music Launch News)  छाया कदम ,कमलाकर सातपुते, रमेश परदेशी, वनिता खरात, सुरेश विश्वकर्मा, विजय निकम, अभिजीत चव्हाण, यशपाल सारनात या स्टारकास्टमुळे  या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

Pimpri News : स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन 

या चित्रपटात तीन गाणी आहेत. ‘केवड्याचं पान तू’ या गाण्याचे गायक अजय गोगावले आणि आर्या आंबेकर हे आहेत तर ‘थाऱ्यावर जीव राहिना’ या गाण्याला वैशाली माडे यांनी व ‘सई माय साजणी’ हे गाणं सायली खरे हिने गायले आहे. सर्व गाण्यांना विजय गवंडे यांनी संगीत दिलं आहे, तर गुरू ठाकूर ही गाणी शब्दबद्ध केली आहेत. म्युझिक लॉन्च सोहळ्याला अल्ट्रा समूहाचे सुशिलकुमार अगरवाल आणि बिझनेस हेड श्याम मळेकर उपस्थित होते. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन  ‘आटपाडी नाईट्स’चे नितीन सिंधुविजय सुपेकर ( Music Launch News) यांचे आहे. हा चित्रपट २० जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.