Pune News : सेव्हन अ साईड फुटबॉल स्पर्धेत पॅंथर्स संघाची शानदार विजयी सलामी

एमपीसी न्यूज : सिटी प्रिमियर लीग (सीपीएल) सेव्हन अ साईड फुटबॉल स्पर्धेच्या पाचव्या पर्वास प्रबल पॅंथर्स संघाने दोन सामने जिंकून आपल्या मोहिमेस झकास सुरुवात केली. (Pune News) आदित्य ऑलस्टारप्स, निरागस नाईटस, डायमंड डॅगर्स संघांनी देखिल विजयी सुरुवात केली. 

स्पोर्ट्स फाउंडेशन पुणेच्या वतीने सिटी एफसी पुणे या स्पर्धेचे आयोजन करत आहे. प्रबल पँथर्स संघाने 15 वर्षांखालील गटात दोन सामने जिंकून आपली बाजू भक्कम केली. प्रबल पँथर्सने सात्विक नायक (5वे मिनिट) आणि राघवेंद्र शानभागेने (18वे मिनिट) नोंदवलेल्या गोलवर  सक्सेस स्ट्रायकर्सवर 2-0 असा विजय मिळवला. त्यानंतर पॅंथर्सने सात्विक नायक (8वे मिनिट) आणि आर्यन स्वामीने (11 वे मिनिट) केलेल्या गोलच्या जोरावर ज्योती जग्वार्सला 2-0 असे हरवले.

“Jaggu aani Juliet” : कोळीवाड्यातला जग्गू आणि अमेरिकन जुलिएटची भन्नाट लव्हस्टोरी!

स्पर्धेतील 9 वर्षांखालील गटात डायमंड डॅगर्सने प्रबल पँथर्सचा 2-1 असा पराभव केला.  डायमंड डॅगर्ससाठी अनुज शिरोत्रेने (6 आणि  11 वे मिनिट) दोन गोल केले.  पँथर्सकडून अयांश पांत्ररे यालाच गोल करण्यात यश आले.  पुढे 11 वर्षांखालील विभागात, निरागस नाईट्सने लव फुलसुंदरच्या  (10 वे मिनिट) एकमात्र गोलच्या जोरावर जीएनएस गनर्सचा 1-0 असा पराभव केला.

प्रत्येक सामना 24 मिनिटांच्या खेळला जात असून, 12 मिनिटाचे एक सत्र आहे.

 

निकाल – 

9 वर्षाखालील : डायमंड डॅगर्स: 2 (अनुज शिरोत्रे 6, 11 वे मिनिट) वि.वि. प्रबल पँथर्स: 1 (आयांश पांढरे 9 वे मिनिट)

11 वर्षांखालील: निरागस नाइट्स : 1 (लव फुलसुंदर 10 वे मिनिट) वि.वि. जीएनएस गनर्स : 0

13 वर्षांखालील : आदित्य ऑलस्टार्स: 2 (माधव अभय 7 वो मिनिट रुद्र घंटेलू 14 वे मिनिट) वि.वि.  डायमंड डॅगर्स : 1 (दक्ष खेडेकर 16 वे मिनिट स्वयं गोल)

15 वर्षांवरील: प्रबल पँथर्स : 2 (सात्विक नायक 5 वे, राघवेंद्र शानभागे 18 वे मिनिट) वि.वि. सक्सेस स्ट्रायकर्स : 0

प्रबल पँथर्स : 2 (सात्विक नायक 8वे मिनिट, आर्यन स्वामी 11 वे मिनिट) वि.वि.  ज्योती जग्वार्स: 0

टीएमपी टायगर्स : 2 (राज पटेल 5 वे मिनिट, आनविक मोदी 11 वे मिनिट) वि.वि. जीएनएस गनर्स : 0

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.