Pimpri News: माझा लढा काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आत्मसन्मानासाठी – सचिन साठे

प्रदेश काँग्रेस सचिव सचिन साठे आणि गौतम आरकडे यांचा जाहिर सत्कार

एमपीसी न्यूज – काँग्रेस पक्षाच्या विचाराला महत्व देऊन हायकमांडचा आदेश पाळत पक्ष संघटनेत काम करणारा मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. या पक्षामध्ये कार्यकर्ता हेच मोठे पद आहे. एनएसयुआय पासून मी काँग्रेसच्या विविध पदांवर काम करीत आहे. येथून पुढे माझा लढा हा कार्यकर्त्यांच्या आत्मसन्मानासाठी असेल, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष, प्रदेश सचिव सचिन साठे यांनी सांगितले.

मागील आठवड्यात पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे आणि गौतम आरकडे यांची प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव पदावर नियुक्ती झाली. याबद्दल शहर काँग्रेस मधिल विविध सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 5 ) साठे आणि आरकडे यांच्या सत्काराचे आकुर्डी येथे आयोजन केले होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी महापौर कविचंद भाट, ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, शामला सोनवणे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, बाळासाहेब साळुंके, परशूराम गुंजाळ तसेच राजेंद्रसिंह वालिया, शहाबुद्दीन शेख, मयूर जयस्वाल, मकरध्वज यादव, लक्ष्मण रुपनर, ॲड. अनिरुध्द कांबळे, गौरव चौधरी, विशाल कसबे, भाऊसाहेब मुकूटमल, मेहताब इनामदार, सुनिल राऊत, हिरामण खवळे, किशोर कळसकर, शोभा पगारे, प्रतिभा कांबळे, मिना गायकवाड, हुरबानो शेख, पांडूरंग जगताप, वैभव किरवे, संदेश बोर्डे, हरिदास नायर, सतिश भोसले, अक्षय शहरकर, विठ्ठल कळसे, गुंगा क्षिरसागर, कुंदन कसबे, तुषार पाटील, दिपक जाधव, सचिन नेटके, सुरेश लिंगायत, सुरेश बारणे, विशाल पंडीत, जेम्स पाटोळे, अतुल गवारे, अमित झिटे आदींसह कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

साठे म्हणाले, शहराध्यक्ष पदाच्या मागील सात वर्षाच्या कार्यकाळात वेळप्रसंगी पद, प्रतिष्ठा पणाला लावून केंद्र सरकारच्या आणि महानगरपालिकेतील भाजपच्या गैरकारभाराविरुध्द रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलने केली. मागील साडेचार वर्षांपासून महापालिकेत विरोधी पक्ष सक्षमपणे भुमिका निभावत नसल्यामुळे सामान्य नागरीकांच्या प्रश्नावर काँग्रेस वेळोवेळी रस्त्यावर उतरत आहे.

शहरात सर्व कार्यकर्ते प्रतिकूल परिस्थितीत काम करीत आहेत. काँग्रेस मध्ये कार्यकर्ता हीच जात आणि धर्म आहे. निधर्मी आणि निरपेक्ष कार्यकर्ता हिच खरी काँग्रेसची शक्ती आहे. शहरातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम आता मी आणि गौतम आरकडे प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत करु. यासाठी कार्यकर्त्यांचे पाठबळ महत्वाचे आहे. मी नेहमी सत्याची बाजू घेत आलो आहे असेही सचिन साठे म्हणाले.

सत्काराला उत्तर देताना महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे नवनियुक्त सचिव गौतम आरकडे म्हणाले की, कॉंग्रेस पक्षाची स्थापना स्वातंत्र्यपुर्व काळात झाली. ब्रिटीश राजवटीपासून आधुनिक भारतापर्यंतची देशाची वाटचाल कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली झाली. परंतू मागिल काही वर्षांपासून कॉंग्रेसचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. कॉंग्रेसला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी आता सर्वांनी मरगळ झटकून कामाला लागावे असे आवाहन गौतम आरकडे यांनी केले. सुत्रसंचालन गौरव चौधरी आणि आभार बाळासाहेब साळुंके यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.