India Corona Update : एकट्या केरळमध्ये 26,701, तर देशात 38,948 नवे कोरोना रुग्ण 

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांत 38 हजार 948 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, 219 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एकट्या केरळमध्ये 26 हजार 701 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 74 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 30 लाख 27 हजार 621 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 21 लाख 81 हजार 995 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 43 हजार 903 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देशात सध्या 4 लाख 04 हजार 874 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भारतात आजवर 4 लाख 40 हजार 752 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.33 टक्के एवढा आहे. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 97.42 टक्के एवढा झाला आहे.

आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 53 कोटी 14 लाख 68 हजार 867 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 14 लाख 10 हजार 649 नमूने तपासण्यात आले आहेत.

लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत देशात 68 कोटी 75 लाख 41 हजार 762 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.