Fruit distribution : ओम श्री साई मतिमंद अनाथ आश्रमातील मुलांना फळवाटप 

एमपीसी न्यूज : नाना काटे सोशल फाऊंडेशन व श्री फाउंडेशनच्या वतीने ओम श्री साई मतिमंद अनाथ आश्रमातील 18 वर्षाखालील 40 मुला-मुलींना दिवाळी सणानिमित्त (Fruit distribution) मुलांच्या पसंतीनुसार कपडे, फळे, खाऊ,व दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदी करून देण्यात आल्या.यावेळी या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

नाना काटे सोशल फाऊंडेशन व श्री फाउंडेशनच्या वतीने ओम श्री साई मतिमंद अनाथ आश्रमातील मुलांना थेरगाव येथील महाराजा क्लॉथ स्टोअर्स मधून कपडे, खाऊ,व दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदी करून देण्यात आले.यावेळी या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असलेला दिसून येत होता. (Fruit distribution) तसेच आकुर्डी येथील वृद्ध आनंद आश्रमातील अनाथांना 40 ब्लँकेट आणि मनोरंजनासाठी एलईडी टीव्ही संच खरेदी करून देण्यात आला.

Indigo Airline : इंडिगो एअर लाईन मध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक

यावेळी माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे , श्री. फाउंडेशनचे संस्थापक सागर पाडाळे, शेकाप पुणे अध्यक्ष नितीन बनसोडे, ओम अनिल पाडाळे, रविना साबळे, सुप्रिया पाडाळे आदी उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.