Nashik News: नाशिक पोलीस आयुक्तालयातील 11 अधिकारी व कर्मचाऱ्यांना महासंचालक सन्मानचिन्ह

एमपीसी न्यूज – 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालयातील एकूण अकरा अधिकारी आणि अंमलदार यांना राज्याचे पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह घोषित झाले आहे.

सन्मानचिन्ह प्राप्त झालेल्यांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ व प्रभाकर घाटगे (गुन्हे शाखा), पोलीस उपनिरीक्षक भीमराव गायकवाड ( गुन्हे शाखा),  सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल भालेराव (गुन्हे शाखा), सहायक पोलीस उपनिरीक्षक भागीरथ हांडोरे ( देवळाली कॅम्प पोलीस ठाणे), ), सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र ठाकरे (पोलीस मुख्यालय), पोलीस हवालदार विष्णू उगले (आर्थिक गुन्हेशाखा), सुरेश माळोदे (म्हसरूळ पोलीस ठाणे) आणि प्रभाकर कोल्हे (सरकारवाडा पोलीस ठाणे), पोलीस नाईक देवराम सुरूंगे (वाहतूक शाखा) आणि भारत पाटील (म्हसरूळ पोलीस ठाणे) यांचा समावेश आहे.

प्रजासत्ताकदिनी पोलीस कवायत मैदानावर होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या अकरा जणांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.