_MPC_DIR_MPU_III

Nashik Crime News : शेती पंपासाठी आकडे तर घरगुती जोडणीच्या मीटरमध्ये छेडछाड – वीज ग्राहकांकडून महावितरणला चुना

एमपीसी न्यूज – पिंपळगाव बसवंतच्या महावितरण विभागाने कारवाईचा बडगा उगारत आतापर्यंत 68 ग्राहकांवर गुन्हे दाखल करत 18 लाख 11 हजारांचा दंड केला.

_MPC_DIR_MPU_IV

आतापर्यंत 14 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वीज चोरीचे अजब फंडे पाहून वीज वितरण कंपनीचे अधिकारीही चक्रावून गेले आहेत. अगोदरच कोरोना काळातील कोट्यवधीचा वीज भरणा ग्राहकांनी भरला नसून त्यामुळे महावितरण विभाग तोट्यात आहे.

_MPC_DIR_MPU_II

त्यातच वीज चोरीमुळे महावितरणाची डोकेदुखी वाढली आहे. वीज पुरवठ्याच्या तुलनेत वीज बिलाच्या रक्कमेत कमालीची घट झाल्याने पिंपळगाव विभागामार्फत 38 गावांमध्ये 28 हजार शेती व घरगुती वीज ग्राहक आहेत. पण दोन कोटी 40 लाख रुपये मासिक बिलाचा उद्दिष्टापेक्षा विजेचा वापर अधिक होत होता. त्यामुळे चोरीतून वीज गळती होत असल्याचे निर्दशनास आले. त्यानुसार पिंपळगाव बसवंत, पालखेड, दावचवाडी, साकोरे, वरखेडा, खेडगाव, पाचोरेवणी, चिंचखेड, कोकणगाव, जवळके वणी, उंबरखेड आदी 11 गावांतील वीज चोरांवर लाखो रुपयांचा दंड ठोठावत वीज चोरीचा शॉकच दिला.

पालखेड, ओझरखेड कालव्याला आवर्तन सुरु असल्याने शेतीला पाणी भरण्यासाठी वीज वाहिन्यांवर आकडे टाकून चोरी करून वीज वापरली जात असल्याचे दिसून आले. उपकार्यकारी अभियंता एकनाथ कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा सत्र सुरू केले असता यात आकडे टाकून अनधिकृत वीज घेणारे ग्राहक पथकांच्या निदर्शनास आले तर मीटरमध्ये छेडछाडीचे प्रकारही उघडकीस आले. या कारवाईमुळे वीज चोरणार्‍यांचे धाबे दणाणले असून 68 जणांवर झालेल्या कारवाईत 18 लाख 11 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून आतापर्यंत 51 जणांकडून 14 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

आकडे टाकण्यासाठी वापरलेली वायर, छेडछाड केलेले मीटर जप्त करण्यात आले आहेत. सहाय्यक अभियंता नितीन पगारे, मंगेश नागरे ,चंद्रशेखर निकम, रामप्रसाद थोरात, योगेश नाठे, विकास गायकवाड आदी कर्मचार्‍यांच्या पथकाने ही कारवाई केली.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.