BNR-HDR-TOP-Mobile

Pune : भारती विद्यापीठ आयएमईडीमध्ये ‘इमर्जींग ट्रेंड्स इन फायनान्स’ विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा

एमपीसी न्यूज – भारती अभिमत विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रूनरशिप डेव्हलमेंट’ (आयएमईडी) मध्ये ‘इमर्जींग ट्रेंड्स इन फायनान्स’विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. आयएमईडीच्या पौड रस्ता कॅम्पस मध्ये ही कार्यशाळा २२ जानेवारी रोजी झाली.
आयसीआयसीआय बँकेचे विभागीय प्रमुख आनंद धर्माधिकारी, डिग्री 212 कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संस्थापक प्रवीण बुधौलीया, येस बँकेचे उपाध्यक्ष यतीन शहा यांनी मार्गदर्शन केले.
आयएमईडीचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी स्वागत केले. डॉ. सोनाली धर्माधिकारी, डॉ. अनुराधा येसुगडे, डॉ.सुचेता कांची, विद्यार्थी उपस्थित होते.
HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like