Nigdi : दुचाकीला कार आडवी लावून तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून चाललेल्या तरुणाला आडवी मोटार लावत चौघांनी मारहाण केली. ही घटना प्राधिकरण येथे घडली.

दिग्विजय दत्तात्रय देशमुख (वय 23), हर्षवर्धन दत्तात्रय देशमुख (वय 26, दोघेही रा. पवारनगर, थेरगाव), सौरभ विलास शिंदे (वय 23), गौरव बनसोड (वय 23, दोघेही रा. महादेव कॉलनी, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी विरेंद्र यशवंतसिंह परिहार (वय 31, रा. शिंदेवस्ती, रावेत) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास फिर्यादी हे आपल्या दुचाकीवरून चालले होते. ते प्राधिकरण येथील रोटरी क्‍लब चौक, येथे आले असता मोटारीतून आलेल्या आरोपींनी तीन-चार वेळा हॉर्न वाजवून त्यांच्या दुचाकीला मोटार आडवी लावली. त्यांच्या दुचाकीची चावी काढून घेत फिर्यादी परिहार यांना एका आरोपीने स्टीलच्या कड्याने व इतर आरोपींनी लाथा बुक्‍क्‍यांनी मारून जखमी केले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.