Sangvi : जूनी सांगवीत यंदा देखाव्यांचे आकर्षण

एमपीसी न्यूज – जूनी सांगवी परिसरात गणपती देखावे पाहण्यासाठी गर्दी होत आहे. या वर्षी मंडळानी भव्यता जपली आहे. मधुबन मित्र मंडळाने साकारलेल्या मल्हारी मार्तंड महलाचा देखावा उभारला आहे. मंडळाचे अध्यक्ष गणेश ढोरे आहे. 

सांगवीचा राजा म्हणून पंचक्रोशीत भव्यता जपलेला सीझन सोशल वेल्फेअर ट्रस्ट व प्रशांत शितोळे मित्र परिवाराच्या सांगवीचा राजाच्या दर्शनासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. बालाजी प्रतिष्ठानच्यावतीने या वर्षी विविध सामाजिक, धार्मिक उपक्रमांवर भर दिला आहे. तर राहीमाई प्रतिष्ठानच्यावतीने होलिका राक्षसिणीचा वध हा हलता देखावा साकारला आहे. जवाहर ढोरे यांच्या संकल्पनेतून हा देखावा साकारला आहे. सात हलत्या मूर्त्या असून 31 वे वर्ष असून राही माई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा माई ढोरे तर शिव मित्र मंडळाचे अध्यक्ष विशाल ढोरे आहेत. मंडळाचे उपाध्यक्ष लक्ष्मण ढोरे, सरचिटणीस रवी कोद्रे, कार्याध्यक्ष मंगेश कोद्रे व शाम कोद्रे, सचिव शाम ढोरे, खजिनदार श्रीधर ढोरे व अक्षय ढोरे आहेत.

श्री समर्थ मित्र मंडळाने मयुररथ हा आकर्षक देखावा साकारला आहे. मंडळाचे 39 वे वर्ष असून गणेश पवार हे अध्यक्ष आहेत. तर उपाध्यक्ष प्रयाग कामठे, कार्याध्यक्ष  सूरज पवार, सरचिटणीस मनीष पवार, चेतन कुंभार आदी आहेत.  जुनी सांगवीतील ढोरे नगर मित्र मंडळ सर्जिकल स्ट्राईक हा देखावा उभारला आहे, मंडळाचे हे 44 वे वर्ष असून मंडळाचे अध्यक्ष गणेश ढोरे आहे. उपाध्यक्ष भूषण शिंदे, सचिव सुनील शेत्रे, कार्याध्यक्ष यतिन शिंदे आहेत.

आनंदनगर मित्र मंडळाने यावर्षी विविधतेतून एकता हा सामाजिक एकतेचे प्रबोझन करणारा जिवंत देखावा उभारला आहे. बालकलाकारांच्या अभियनांतून सर्व मानव बांधव आहे. हा संदेश औंढा नागनाथ मंदिर चमत्कार हा जिवंत देखाव्यांतून दिला आहे. मंडळाचे अध्यक्ष लिओ जुल्स असून मंडळाचे हे 41 वे वर्ष आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.