New City Pride : न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी साजरी

एमपीसी न्यूज : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन (New City Pride) फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार,कुलकर्णी सर, संगीता शहाडे मॅडम(बार्टी)शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

Bhosari Crime News : उसने पैसे दिले नाहीत म्हणून अपहरण करुन मारहाण

भक्ती पठाडे इयत्ता तिसरी, मोहित, लावण्या प्रधान इयत्ता चौथी या विद्यार्थ्यांनी  लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल आपल्या भाषणातून माहिती सांगितली. (New City Pride) कार्यक्रमाच्या अध्यक्ष नंदिनी चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले “जय जवान जय किसान” हे लाल बहादूर शास्त्री च्या घोषवाक्याचा हेतू त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी पाटील यांनी तर सरला शिंदे यांनी उस्थितांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.