New Delhi : ट्रस्टची स्थापना करून अयोध्येत राम जन्मभूमी मंदिर निर्माणाचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

एमपीसी न्यूज- अयोध्येमधील वादग्रस्त जागा हिंदूंचीच असून या जागेवर ट्रस्ट स्थापन करून या जागेवर मंदिर बनविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या रामजन्मभूमी व बाबरी मशीद प्रकरणावर अखेर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. या जागेवर तीन महिन्यात ट्रस्टची स्थापना करून या जागेवर राम मंदिर बनविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येत पर्यायी पाच एकर जागा देण्यात यावी, असेही निकालपत्रात म्हटले आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडून या प्रकरणावर ४० दिवस सुनावणी घेण्यात आली. या पीठात सरन्यायाधीशांबरोबरच न्यायाधीश एस. ए. बोबडे, डी. वाय. चंद्रचूड, अशोख भूषण आणि एस. अब्दुल नजीर यांचा सहभाग होता. ५ सदस्य असलेल्या या खंडपीठाने आज या प्रकरणी आपला ऐतिहासिक निर्णय दिला. या निर्णयाचे सुन्नी वक्फ बोर्डाने स्वागत केले आहे. त्याचबरोबर अयोद्ध्येमध्ये अन्य ठिकाणी मशिदीसाठी पाच एकर जागा देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

# सुन्नी वक्फ बोर्डाकडून निर्णयाचे स्वागत

# ट्रस्टची स्थापना करून राम मंदिर निर्माणाचे आदेश

# ट्रस्ट स्थापन करून मंदिर निर्माण करण्याचा आराखडा सादर करण्याचे केंद्र सरकारला आदेश

# वादग्रस्त जमीन रामलल्लाची

# मुस्लिमाना अयोध्येमध्ये 5 एकर पर्यायी जागा मिळणार

# सुन्नी वक्फ बोर्डाला पर्यायी जागा देणे आवश्यक

# अलाहाबाद कोर्टाने वादग्रस्त जागेचे त्रिभाजन करण्याचा दिलेला निकाल अवैध

# ‘रामलल्लाचे कायदेशीर अस्तित्व कोर्टाला मान्य’

# ‘1856 पूर्वी वादग्रस्त जागेवर हिंदूंकडून पूजा’

# ‘1856-57 मध्ये नमाज पठण झाल्याचे पुरावे नाहीत’

# सुन्नी बोर्डाच्या दाव्यावर निकालाचे वाचन सुरु

# रामलल्लाचा ऐतिहासिक उल्लेख

# ‘राम मंदिर 12 व्या शतकातील’

# ‘हिंदू मंदिराच्या रचनेवर मशिदीचे बांधकाम करण्यात आले’

# ‘खोदाई दरम्यान मुस्लिम बांधकामाचे अवशेष मिळाले नाहीत’

# ‘अयोध्या राम जन्मभूमी आहे हे निर्विवाद’

# ‘बाबरी मशीद मोकळ्या जागेवर बांधण्यात आलेली नव्हती’

# ‘मशिदीच्या अवशेषांच्या खाली मंदिर असल्याचे पुरावे मिळाले’

# बाबरच्या काळामध्ये मीर बाकी याने मशीद बांधली- मुख्य न्यायमूर्ती

# जमिनीच्या मालकीबाबत थोड्याच वेळात निकाल

# मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांचेकडून निकालवाचनाला सुरुवात

# अयोध्या निकालावर सर्व संमतीने निर्णय- मुख्य न्यायाधीश

# सर्व पाच न्यायाधीशांचे निर्णयावर एकमत

# निर्णय अहवालावर सर्व न्यायाधीशांच्या स्वाक्षऱ्या

# एक नंबरच्या कोर्टामध्ये वकिलांची गर्दी

# न्यायमूर्ती रंजन गोगोई न्यायालयात पोहोचले

# खंडपीठातील 5 न्यायाधीश न्यायालयात पोहोचले

# सकाळी साडेदहा वाजता निकालपत्राच्या वाचनाला सुरुवात

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.