New Delhi : आयकर आयकर परतावा भरण्यासाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ

एमपीसी न्यूज – आर्थिक वर्ष 2018-2019 साठी आयकर आयकर परतावा भरण्याची अंतिम मुदत 31 मार्चवरून 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. या कालावधीनंतर उशिरा केलेल्या भरण्यासाठीचा व्याजदर सुद्धा 12 टक्क्यावरून कमी करत 9 टक्के करण्यात आला आहे. तसेच उशिरा टीडीएस भरणा करण्यासाठी व्याज दर 18 टक्क्यावरून 9 टक्के करण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी परिषदेत दिली.

केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण आणि अर्थ राज्य मंत्री यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर  काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यामध्ये मार्च, एप्रिल आणि मेसाठी जीएसटी भरण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. पॅन कार्ड आणि आधार जोडणीसाठीही मुदतवाढ देण्यात आली असून, आता 30 मार्चपर्यंत आधारची पॅन कार्ड बरोबर जोडणी करता येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सचिवालय 31 मार्चपर्यंत बंद राहणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.

दरम्यान, कोणत्याही बँकेच्या एटीएम मधून पैसे काढल्यास तीन महिन्यांसाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. त्याचबरोबर मिनिमम बॅलेन्ससाठीही कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.