New Delhi : ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, फिटनेस आणि परमिट कागदपत्रांची वैधता 30 जून पर्यंत वाढविली  

एमपीसी न्यूज – लाॅकडाऊन मुळे जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करण्यासाठी अन्नधान्य, दूध आणि वाहतूक सुरू ठेवली आहे. या वाहनांच्या वाहतुकीला तसेच चालकांना कोणताही अडथळा येऊ नये म्हणून  चालक परवाने, वाहन नोंदणी व फिटनेस आणि परमिट या कागदपत्रांची वैधता 30 जून पर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकार कडून घेण्यात आला आहे.

मोटर वाहन कायदा 1988 व केंद्रीय वाहन नियम 1989 अंतर्गत ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, फिटनेस आणि परमिट कागदपत्रांची नूतनीकरणाची वैधता 1 फेब्रुवारी ते 30 जून च्या मध्ये आहे त्या सर्वांची वैधता 30 जून पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. आरोग्य आणिबाणीच्या दिवसात जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित वाहतूक विभागाणी या बदलाची नोंद घ्यावी आणि संबंधित कागदपत्रे 30 जून पर्यंत वैध ग्राह्य धरावी असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.