Talegaon Dabhade : नगरपरिषद प्रभाग क्र. 7 ब मधील पोटनिवडणूक : 3893 पैकी 2129 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; एकूण मतदान टक्केवारी 54.68%

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. 7 ब मधील पोटनिवडणुकीसाठी मतदानमध्ये उत्साह दिसून आला. मतदारांनी थंडीची तमा न बाळगता सर्व मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. भाजपाचे तत्कालीन नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली. यामध्ये 3893 पैकी 2129 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.  एकूण 54.68 % इतके मतदान झाले. 

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. 7 ब मधील पोटनिवडणुकीत सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून आला. पहिल्या दोन तासात 9.40 टक्के मतदान झाले. पुढील दोन तासात 20.57 टक्के मतदान झाले. यामध्ये 801 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 480 पुरुष व 321 स्त्री मतदारांचा सामवेश आहे.

या पोटनिवडणुकीत 3 हजार 893 मतदार असून 2 हजार 94 पुरुष तर 1 हजार 799 महिला मतदारांचा समावेश आहे. तळेगाव स्टेशन येथील नवीन समर्थ विद्यालयातील 4 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. मतदारांनी थंडीची तमा न बाळगता मतदानासाठी रांगा लावल्या होत्या.

भाजपाचे तत्कालीन नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली. दोन्ही पक्षांकडून ही प्रतिष्ठेची निवडणूक केली गेली.

आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, शहर अध्यक्ष संतोष दाभाडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गणेश काकडे, पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष व नगरसेवक गणेश खांडगे, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, राजेंद्र जांभुळकर, ज्येष्ठ नेत्या रुपालीताई दाभाडे, नगरसेविका वैशाली दाभाडे, मंगलताई भेगडे, तळेगाव शहर महिला उपाध्यक्ष ज्योती शिंदे, तळेगाव शहर युवती अध्यक्ष निशा पवार हे आपापल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी तळ ठोकून होते.

पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
अमरनाथ वाघमोडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.