Crime News : भाचीने चोरले मामाच्या घरातून दोन लाखांचे दागिने

 एमपीसी न्यूज – मामाच्या गावची मजा आपण एकदा तरी लुटलेली असते. मात्र याच मामाच्या घरातून चोरी करण्याचे धाडस कोणी केले नसेल. मावळ परीसरातील मात्र भाचीनेच मामाच्या घरातून दोन लाख रुपयांचे दागिने (Crime News) लंपास केले आहेत. हा प्रकार शनिवारी (दि.16) घडला.

याप्रकरणी 58 वर्षीय मामाने सोमवारी (दि. 18) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 24 वर्षीय भाचीला अटक करण्यात आली आहे.

 

Pune Crime News : पुण्यातील महिलेचा खून करून उत्तर प्रदेशात पसार झालेल्या सुखाबिंदाला अखेर अटक

 

 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणी फिर्यादी यांच्या घरी राहत असताना घराच्या उघड्या खोलीत ठेवलेली चावी घेऊन घराचा मुख्य दरवाजा उघडला. त्यानंतर लोखंडी कपाटातून एक लाख 20 हजारांचे मंगळसूत्र, 35 हजारांचे ब्रेसलेट, 30 हजारांची चपटी चेन, 12 हजारांची चौकोनी अंगठी, नऊ हजारांची अंगठी, 12 हजार रोख (Crime News) रक्कम असा एकूण दोन लाख 18 हजारांचा ऐवज चोरून नेला.

घरातील दागिने चोरीला गेल्यानंतर सर्वांकडे विचारपूस केली असता फिर्यादी यांच्या भाचीने दागिने चोरल्याचे सांगितले. मात्र तिने ते दागिने परत न दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तरुणीला अटक केली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.